कूठे घेऊन चाललात महाराष्ट्र माझा

Started by sharad Halde, November 10, 2017, 11:25:51 AM

Previous topic - Next topic

sharad Halde

अरे कूठे घेऊन चाललात  महाराष्ट्र माझा

गडकिल्ले शेवटचा श्वास घेत असताना,
स्मारक कूणासाठी कशासाठी बाधताय
इथे बेरोजगारी प्रचंड वाढत असताना,
उद्योग दूस-या राज्यात कूणासाठी नेताय
सा-या देशाचा भार ऊचलून ही
घरात आत्महत्या करतोय शेतकरी राजा
अरे कूठे घेउन चाललात महाराष्ट्र माझा

पूलांसाठी पैसे नाहीत, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत,
मग बूलेटट्रेन,जाहीरातीवर ईतका खर्च कसा करता
अच्छे दिन च हाडूक गळ्यात अडकलय तूमच्या,
मग स्वप्न दाखवून सत्तेचा घास स्वतःच का गिळता
लोकांनी ईतक्या विश्वासानी सत्ता परीवर्तन केलय
सवतीसारख भांडताना कशा नाही वाटत लाजा
अरे कूठे घेऊन चाललात महाराष्ट्र माझा

शरद हळदे