डोळ्यात तुझ्या

Started by शिवाजी सांगळे, November 10, 2017, 01:34:06 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

डोळ्यात तुझ्या

नको सागर डुंबू दे सखे डोळ्यात तुझ्या
नसे पुष्पहार पडू दे हात गळ्यात तुझ्या

उमगतोय अर्थ हळूवार अबोल प्रितीचा
क्षणोक्षणी होणाऱ्या गूढं चाळ्यात तुझ्या

रूसलेच ऋतू जरी अलवार चोहीकडे
फुलतात फुले सारी सखे गं मळ्यात तुझ्या

ठरविले मी तोडून पाश सारे जगावे
गुंतलो आहे असा सखये जाळ्यात तुझ्या

शोधतांना एकांतात कधीचा स्वतःला
रमतो कसा मी आठवांच्या मेळ्यात तुझ्या

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९