कवितेचा शाप

Started by Asu@16, November 11, 2017, 05:43:48 PM

Previous topic - Next topic

Asu@16

कवितेचा शाप

कवितेचा शाप
दिला देवराया
रात्रंदिन ताप
दिला देवराया
मनाचा ताप
सदा देवराया
मत्स्य, विना आप
कवि देवराया
शांतीचे माप
घाली देवराया
तुजविण मायबाप
ना वाली देवराया
कवीस उ:शाप
देई देवराया
कवितेचे पाप
घेई देवराया

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita