पाहिजे

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 12, 2017, 01:14:26 PM

Previous topic - Next topic
दुष्मन असला तरी
दुष्मनीत तो रुबाब पाहिजे

शब्दांची यारी होतं जाते
पण सादर करण्याचा थाट पाहिजे

रोजचं लिहण्याची किमया होते
लिहण्यातला शब्द अर्थ पूर्ण पाहिजे

मैत्रीत रोजचं होतात वाद
समजून घेण्याची औकात पाहिजे

नात्यानं मधल्या दुराव्यांत
समजूत काढणारा तो यार पाहिजे

सौंदर्याचा गर्व असावा पण
त्या सौंदयाला जाणणारा पाहिजे

सौभाग्याचं लेन महत्वाचं आहे
पण सौभाग्य जपणारा पाहिजे

प्रेमाच्या वाटा विखुरलेल्या असतात
पण त्या वाटा जोडणारा दुवा पाहिजे


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर