आयुष्य सारं बालपणातच जावं...

Started by drsaindane, November 14, 2017, 08:40:31 AM

Previous topic - Next topic

drsaindane

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

आयुष्य सारं बालपणातच जावं...

नव्हता हेवा गाडी-बंगल्यांचा,
लहानपपणच बरे होते देवा...
या चिमुरड्यांना पाहून,
आता बालपणाचाच वाटु लागला हेवा...

हातांचा करित झोपाळा,
खेळ खेळितो गोपाळं...
गारा-माती, चिखल, पाणी,
हाच गोपाळांचा खेळं...

खेळ कुठलाही असो,
त्यांतुन आनंदाचाच झरा वाही...
दु:खाच्या झ-याचा,
ते बांधच फुटु देत नाही...

जाती-पातींची जान,
नाही त्यांच्या ध्यानीमनी...
मनसोक्त वाटतात एकमेकांत हर्ष,
आणि भिडवता ते गगनी...

वाटतं मनोमनी,
आयुष्य सारं बालपणातच जावं...
कारण बालपणातच,
जिवन जगण्याला आहे खरी वाव...

शब्दरचना:- दिपक सैंदाणे करणखेडे, अमळनेर, जि. जळगांव, भ्र. क्र. :- ९९७५८५४६६९