मायेची भाकर

Started by wadikar durga, November 14, 2017, 12:45:09 PM

Previous topic - Next topic

wadikar durga

जोंधळ्याच्या कणसाची
मह्या मायीची भाकर
कधी उसनवारीची
कधी मागून आणलेली

देते पोटाला चिमटे
दुरडीत कोर ठेवलेली
दिस राबराब राबते
घामातून निथळलेली

इत भर पॉट त्याची
भूक मिटता मिटेना
ह्या निर्दयी जगात
भाकर मिळता मिळेना
@दुर्गा
https://durgadepak.blogspot.in/
https://www.facebook.com/profile/wizard/async/dialog/