शेतक-यांची सकाळ.

Started by कदम, November 14, 2017, 02:12:08 PM

Previous topic - Next topic

कदम


दुभती जनावरं (शेतक-यांची सकाळ).

जनावरांची धार काढायला गोठा गाठला
दुधासाठी कासेखाली म्हसराच्या माठ घातला

दावणीला अमुना टोपली भरून घातला
कुरवाळण्या मानेत म्हसराच्या हात घातला

धुवून घेण्या कासेवरती पाण्याचा शिडकाव घातला
दुधासाठी कासेत म्हसराच्या हात घातला

सकाळची धार काढली अन् देव भेटला
न्याहारी मध्ये खायला दूधभात भेटला

दुधाच्या धारेत द्रव अमृततूल्य भेटला
गोठ्यातच मज जणू पुर्णब्रम्ह भेटला