भेटीची आठवण

Started by Shyam, February 05, 2010, 11:53:19 PM

Previous topic - Next topic

Shyam

भेटीची आठवण

तू इथे येऊन गेल्यावर
मनावर खुणा ठेऊन गेल्यावर
माझे सगळे जगच हुरहुरे
जसे होते भाळी केस भुरभुरे
.
तू इथे येऊन गेल्यावर
मीच मला वास्तवात नेल्यावर
माझे तुझे सगळेच विश्व
स्वप्नदेशी उधाणे घेऊन अश्व
.
तू इथे येऊन गेल्यावर
वचन गहिरे आतून दिल्यावर
चौफ़ेर घट्ट प्रेमाचाच विषय
मनी वेड्या तरीही शहाणा आशय
.
तू इथे येऊन गेल्यावर
तुझेही अंगण झुले प्रेमझुल्यावर
तुझ्या खळीत दाटे जो भाव
त्यात मला आंदण आख्खा गाव

Author Unknown..


gaurig


Shyam