नव्या नव्या रस्त्यावर

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 17, 2017, 09:13:04 AM

Previous topic - Next topic
नव्या नव्या रस्त्यावर
मी तुला का शोधू पाहतो ?

नागमोडी त्या खडतर नात्यांत
पाण्यासारखा का मी वाहतो ?

हृदयाची दारे बंद झालीत केव्हाची
दारावर त्या मी का तुला पाहतो ?

निळ्या क्षार या आभाळी
नव्याने पुन्हा प्रीतीचा का इंद्रधनू दिसतो ?

प्रेमाच्या सप्तरंगात नवं रंग
भरतांना का मी नेहमीचं तुला शोधतो ?

हृदयातील स्पंदने केव्हा भेटतील
प्रेम तरंगात का मी नाचतो ?

प्रेम आपुले झाले खरे पण
जातीच्या मापदंडात का मी तोलू पाहतो ?


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]