सांग ना रे माणसा माझं यात कुठं चुकलं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 18, 2017, 09:28:38 AM

Previous topic - Next topic
सांग ना रे माणसा
माझं यातं कुठं चुकलं
खोट्या प्रेमाचा डाव होता
त्यात माझं कुठं चुकलं

मखमली प्रेमाची शाल तिची
त्यानं हळूच पांघरून घातलं
सुंदर स्वप्न म्हणून मीही अंगावर घेतलं
खरंच यात माझं कुठं चुकलं

पैसे लुटण्याचा गवती चिकट्या होता
त्याला मी पण नाही पाहिलं
चिकटा चिकटून बसला गोचिडा सारखा
त्यात अंग अंग माझं जळालं

पै पै गोळा करून
मी तिला संभाळलं
शेवटी विरहाच्या नरकात
तिनं मला ढकललं

सांग ना रे माणसा
माझं यातं कुठं चुकलं
आंधळ प्रेम माझं यातं
चांगलंच तिनं लुबाडलं

सांग ना रे माणसा
माझं यातं कुठं चुकलं
सांग ना रे माणसा
माझं यातं कुठं चुकलं


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]