शब्द फुलांचा

Started by Kumar Sanjay, November 18, 2017, 01:25:37 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

 आर्त हाकेला एेकुण
  तु राया धावत आला
  अन्  शब्द फुलांचा
  अंभग हार झाला 

  किती जन्माच्या हाका
  जन्म कित्येक जाती
   दिसला तूझ्या पायाशी
   माझाच मला सांगाती

  मोहात नको फसणे
  की तूझ्या रूपाच्या छाया
  सावळ्या अंतकरणांनी
  मिटेल माझी काया 

# कुमार संजय