वेडे

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 19, 2017, 11:42:41 AM

Previous topic - Next topic
 वृत्त.मनोरमा

लगावली
गालगागा गालगागा

जात दावी बोट वेडे
खोड सारी खोट वेडे

बंध सारे सोड वेडे
बांध सारी मोट वेडे

रोज आहे भाव वेडे
नाव त्याचे नोट वेडे

प्रेम आहे दाव वेडे
मोड सारे थाट वेडे

मंद आहे रात वेडे
दूर आहे वाट वेडे

वेल आहे उंच वेडे
मूळ त्याचे काट वेडे

घे जुळोनी गाठ वेडे
गाऊ नाही नाट वेडे

कोण नाही आपले रे
पार लावू घाट वेडे

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर