ये ना

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 21, 2017, 09:53:40 AM

Previous topic - Next topic
ऐक काळजाची हाक ये ना
जातो जीवाचा झोक ये ना

नात्याच्या त्या बंधनात
जाऊ दोघे ओघात ये ना

नको जाऊ दूर पुन्हा
घेऊ मिळोनी दुःख ये ना

नाही जरी कोण माझं आता
बांधू प्रेमाची गाठ ये ना

रात होता रोज जातो
तुझ्या स्वप्नांत ये ना

राहिले जे आता फक्त
तुझा आधार ये ना

गुन्हा काय यात माझा
प्रेम आहे तुजवर ये ना

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर