जात

Started by sharad Halde, November 21, 2017, 11:36:51 AM

Previous topic - Next topic

sharad Halde

जात

पूर्वी लोक जातपात मानत होती
तर जाती प्रमाणे जगत ही होती

ब्राह्मणाच्या अंगावर सावली पडणार नाही
ह्याची काळजी दलित घेत होता
अन लांबून का होईना ब्राह्मणही दलिताच्या
ओंजळीत पाणी ओतत होता

आता आपण  जात पात मानत नाही
म्हणून जातीचे नियमही पालत नाही
तरीही आपल्याला  जातीचा अभिमान  किती
कधी कधी तर देशाची मातीही पडते तिच्यासमोर  फीकी

खरतर आपण कितीही  म्हटलं
आपण जातपात मानत नाही,
तरीही  ती आपल्यात जिंवत आहे
कारण जात समाजात नाही     
तर   आपल्या मेंदूत आहे

अन खरतर ती कधी संपतही नाही, तर फक्त
स्वरूप बदलत जाते ........
कधी मिरवणूकीची गर्दी, गरब्याचा टाईम, तर कधी  आजानच्या  भोंग्याच्या विरोधात ती स्पष्ट जाणवते..

अशी जात,
कधी कधी आपल्याला बिघडवते
तर कधी कधी घडवते... सूद्धा

चाॅईस आपली आहे
आपल्याला समाज घडवणारी
जात हवी

की बिघडवणारी........

शरद हळदे