* श्रापित कवी *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 23, 2017, 09:24:58 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे



सा-यांना वाटे नेहमी
कवीता खेळ शब्दांचा
चंद्र सुर्य ता-यांना
काव्यात गुंफित जाण्याचा

परी जाणले कोणी
हा घाव वेदनेचा
की अंतरी सलणा-या
ओल्या जखमेचा

मैफिलीत जाता कवी
आवाज होई टाळ्यांचा
कारण ठाव घेई
कवी,गर्दीमध्ये दर्दीचा

हेवा वाटतो लोकांना
कविता करणा-यांचा
पण कळेना कुणाही
भाव कवीमनाचा

सा-यांचा असुनही कवी
नसे कधी स्वताचा
श्राप कसला हा
मिळे कविता करण्याचा

अवतीभवती असे गर्दी
कौतुक करणा-या रसिकांची
पण मिळेना साथ कधी
कवीला,घरच्याच माणसाची
हीच कहाणी आहे
श्रापित कवी जीवनाची.
*कवी - गणेश साळुंखे*
*📱- 8668672192*