प्रेम हे असंच असतं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 25, 2017, 05:22:35 AM

Previous topic - Next topic
*प्रेम हे असंच असतं*

कधी स्वप्नांच्या
हिंदोळ्यावर झुला देणार
तर कधी त्या झुल्यावर
एकटंच विचार करायला लावणार

*प्रेम हे असंच असतं*

कधी कुरवाळून
जवळ बोलावणार
तर कधी अश्रूंच्या धारानं
मन ओल चिंब करणार

*प्रेम हें असंच असतं*

कधी सुखात
असतांना जवळ येणार
तर कधी दुःखाच्या गर्तेत
दुरूनच ढकलून देणार


*प्रेम हे असंच असतं*

शेवट पर्यंत सोबत
देण्याच्या आणाभाका घेणार
तर कधी मध्येच अनोळखी
व्यक्ती साठी हात सोडणार

*प्रेम हे असंच असतं*

कधी आपल्या पावलावर पाऊल ठेऊन
आपल्या बरोबर चालणार
तर कधी त्याचं पावलांना
भर उन्हात चटके झेलण्यास सोडणार

*प्रेम हे असंच असतं*

कधी चार मित्रांबरोबर
कट्ट्यावर मज्जा पाहणार
तर कधी त्याचं कट्ट्यावर
सिगरेटची नशा करायला लावणार


*प्रेम हे असंच असतं*

कधी मित्रांत बसल्यावर
खळखळून हसवणार
तर कधी त्याचं मित्रांतून
उठवून आडोशाला रडवणार


*प्रेम हे असंच असतं*

जीवनात असतांना खूप
आनंदाचे क्षण देणार
तर कधी त्याचं क्षणांना
घेऊन विरहाच्या दरीत लोटणार


*प्रेम हे असंच असतं*

जीवंत आहे तो पर्यंत
आनंदाचा पाऊस देणार
तर कधी अश्रूंच्या सरींन
मरणाच्या वाटेत लोटणार

*प्रेम हे असंच असतं*


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर