तू माझे सर्वकाही

Started by प्रियंका, November 25, 2017, 04:29:53 PM

Previous topic - Next topic

प्रियंका

बस न जरा वेळ
ऐक माझं पण काही
कविता करते तुझ्या वर
सुचेना पण मज काही

शोधून थकून गेले
सापडले मला न परत काही
तू घेऊन गेलास हृदय माझे
ते आता माझ्या जवळ नाही

ऐकत राहावे मी
आणि बोलावे तू मज काही
तू बोलत का नाही
मला ऐकायांचं तुझ्या ओठांमधून काही

प्रेम तुझे माझ्या वर आज तेवढे नाही
लापाशील तरी किती तुझ्या डोळ्यात दिसते सर्वकाही
निशब्द होऊनी बसशील तरी किती
मज बोलशील हळूच कानी


प्रेम आहे तुझ्या वर माझे
पुन्हा एकदा आणि तू माझे सर्वकाही ....


   {{ सिध्दार्थ गायकवाड }}

Shrikant R. Deshmane

arthapurna kavita,
survat n shevat masta kela..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]