उजाड माळावरी

Started by Asu@16, November 26, 2017, 02:39:53 PM

Previous topic - Next topic

Asu@16

      उजाड माळावरी

उजाड माळावरी
अजुनि कसा भूवरी ? शेतकरी
सूर्य डुंबला तरी, उजाड माळावरी
थकले वारे, थकले सारे
थकले तयाचे हात बिचारे
जठरी अग्नी, नयनी ग्लानी
अन्नदाता तरी भिकारी
वण-वण भटके कां अनवाणी
उजाड माळावरी !
सूर्य डुंबला तरी, उजाड माळावरी
दिशा बुडाल्या तम:सागरी
हसती चांदण्या बघून अंबरी
दिवटा कुणी हा दिसे निशाचरी
शोधित भटके अजुनि भूवरी,
मातीतून का अजब तिजोरी
उजाड माळावरी !
सूर्य डुंबला तरी, उजाड माळावरी

- अरूण सु.पाटील

(मैफल दिवाळी अंक १९७८ मध्ये प्रसिद्ध)

https://www.facebook.com/AsuChyaKavita