काय सांगू सखे

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 28, 2017, 06:50:42 AM

Previous topic - Next topic
काय सांगू सखे काय हा तुझा तोरा गं
तुला पाहून तोल हा माझा जातो गं

नागिणी वाणी आहे तुझी चाल गं
प्रीत तुझी विषा परी भासते गं

नाय म्हणता प्रेमात तुझ्या पडतो गं
तुला पाहून अंग अंग माझं जळतं गं

प्रेमाचे रंग उधळले दाही दिशा गं
तू आहेस सौंदर्याची खाण गं

तुला पाहून तोल हा माझा जातो गं....


कानाचे डूल बघ कशे डुलतात गं
नजर तुझी घायाळ मज करती गं

तुला पाहून तोल हा माझा जातो गं...

मनाला नाही राहिला आता ठाव गं
पैंजनाचा आवाज कानी घुमतो नुसता गं


तुझ्यासाठीच जीव हा माझा रडतो गं
मज वर पुन्हा प्रेम तुझं दाखव गं

तुला पाहून तोल हा माझा जातो गं

स्वप्नात तुझ्या खूप हाल झाले गं
नेहमीच सखे अश्रू अनावर होतात गं

या जीवाची थोडी किव कर गं
तुझ्याविना जगू कसा सांग गं

मनाला माझ्या एकदा तरी विचार गं
येऊन एकदा पुन्हा मिठीत घेना गं

येऊन एकदा पुन्हा मिठीत घेना गं

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर