मी

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, November 29, 2017, 06:02:40 AM

Previous topic - Next topic
मिलनाच्या वाटेवर
का सांगू तुला निहाळतो मी

घुसमटलेल्या श्वासावर
का तुझ्या वेदना सोसतो मी

अंथरले काटे जमिनीवर
का त्या काट्यात आपलेपण पाहतो मी

त्या प्रत्येक आठवणींत
का तुला नेहमीचं शोधतो मी

त्या पावसाच्या सरींत
का नकळत एकटा न्हाहतो मी

वाटसरू आहे मी अनोळखी वाटेवरचा
का त्या दुःखी वळणांवर उभा राहतो मी

एक एक गाठ जोडतो आहे
का त्या प्रत्येक गाठीतं सैल होतो मी

गाठोडं आहे सोबतीला प्रेमाचं
का त्यातं विरहाचे चटके झेलतो मी

वात आहे तुझ्या सोबतीची
का तरी त्या उजेडात नेहमी विझतो मी

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो. ९६३७०४०९००.अहमदनगर

sumedh thool


Ajay Pardeshi

 

  अप्रतिम वर्णन..