स्वप्न

Started by ajaymohite, February 06, 2010, 07:42:46 PM

Previous topic - Next topic

ajaymohite

एक गुपित सांगु का तुला? हसायच नाहीस हं.. "ती म्हणली
"सांग.. नाही हसणार" ..
"अरे काल रात्री, खूप छान स्वप्न पडल होत मला ...
संततधार पाऊस पडत होता.
मातीचा गंध चहुकडे दरवळ्त होता..
पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब मला वेडावत होता...
मी त्या पावसात ओलेचिंब भिजले होते..
माझ्या रोमा-रोमात जणू ओला प्राजक्त फ़ुलून आला होता..
तो पाऊस काही वेगळाच होता..."
ऐकल आणि खूप हसू आल मला...
चिडून ती म्हणाली...
काय रे, हसतोयस काय असा...
तुला पटत नाहिये का? जा, बोलू नकोस माझ्याशी!!!!!!!!!
अग काय सांगु आता..
पटणार नाहीच तुला......
काल मलाही एक स्वप्न पडल होतं..
अगदी वेगळंच.............
..........
..........
...................
................
.......
काल पहिल्यांदाच...........
स्वप्नात
मी पाऊस झालो होतो !!!

-अजय
(ajaymohite@gmail.com)

amoul


Mayoor

काल पहिल्यांदाच...........
स्वप्नात
मी पाऊस झालो होतो !!!

Good one

Parmita


Karuna Sorate


Sonal_ Patil


sujata


@GG

तो पाऊस काही वेगळाच होता...
AANI
काल पहिल्यांदाच...........
स्वप्नात
मी पाऊस झालो होतो !!!

good thinking !  ;)

nirmala.