अश्रु

Started by Ajal Shayar, November 30, 2017, 10:47:49 AM

Previous topic - Next topic

Ajal Shayar


        अश्रु

तु माझ्याशी जेव्हा
बोलावयाचे टाळले
काय सांगु कीती तेव्हा
अश्रु मी गाळले

हसताना इतरांशी जेव्हा
तुला मी पाहीले
काय सांगु कीती तेव्हा
अश्रु मी गाळले

ऐकला तुझा नकार जेव्हा
काळीज माझे फाटले
काय सांगु कीती तेव्हा
अश्रु मी गाळले

तुझ्या शब्दांचे काटे जेव्हा
ह्रदयात माझ्या रूतले
काय सांगु कीती तेव्हा
अश्रु मी गाळले

धरलास अबोला जेव्हा
मन माझे गं रडले
काय सांगु कीती तेव्हा
अश्रु मी गाळले

झाली पहाट जेव्हा
स्वप्न माझे भंगले
काय सांगु कीती तेव्हा
अश्रु मी गाळले

फुटके नशीब जेव्हा
माझे मला कळले
काय सांगु कीती तेव्हा
अश्रु मी गाळले

तुटले आपले नाते जेव्हा
आयुष्य माझे संपले
काय सांगु कीती तेव्हा
अश्रु मी गाळले

थवे आठवणींचे जेव्हा
मनात माझ्या दाटले
काय सांगु कीती तेव्हा
अश्रु मी गाळले


अजल


sneha31

Very nice ... heart touching

Shrikant R. Deshmane

khup chan,
survatch bhari kelit kavitechi ajal ji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]