दिवस थंडीचे

Started by Pravin Dongardive, November 30, 2017, 06:03:03 PM

Previous topic - Next topic

Pravin Dongardive

आगमन होता हिवाळी ऋतूचे
आले दिवस गुलाबी थंडीचे
सकाळच्या रम्य प्रहरी
गारठते गाव शिवार सारे
कडाक्याच्या थंडीत
मज झोंबती गार वारे
थंडीत वाटतो तू भास्करा
मज नेहमी हवा हवा सा
अन उन्हाळ्यात भासतोस तू
मजला रोज नवा-नवा सा
थंडीच्या दिवसात इथे
बगळ्यांची माळ दिसते
भिजणाऱ्या शेतात इथल्या
बगळ्यांची शाळा भरते
थंडीचा ऋतुच असतो वेगळा
असते ओढ स्वतःला जपण्याची
आस लागते लहानग्या जीव
आईच्या कुशीत निजण्याची
अशीच जपावी जगती नाती
माय लेकरांसारखी.
                 प्रविण डोंगरदिवे