" मैत्री आणि जुन्या आठवणी.. "

Started by Ajay Pardeshi, December 01, 2017, 06:44:07 PM

Previous topic - Next topic

Ajay Pardeshi

           
              " मैत्री आणि जुन्या आठवणी ..."

मित्रांची सांज-महफ़िल ही अनोखी
सवांद होई मनाशी,
बेभान साऱ्या जगाशी,
साक्षीदार हे तारेही लुकलुकती आकाशी ।।१।।

मस्तीची शाळा ही रोज अशी भरायची
कट्यावरच्या गप्पावर हार-जीत ठरायची
चहाच्या टपरीवर रंगत खरी रंगायची
आज ही तर उद्या ती कोणीतरी आवडायची ।।२।।

जगण्याची खरी मजा तर त्या दिवसात मिळायची
मौज ती आगळी-वेगळी, मनास सुख द्यायची,
"गेले ते दिवस...राहिल्या फक्त त्या आठवणी"
उरलेले दिवस आता सार्थकी लावायची ।।३।।

आठवणीच्या क्षणांनी हे दिवस आता भरावे
खंत ना कुठली ह्या मनाशी आता उरावे
राहिल शेवटची इच्छा या मित्रांसोबत
पुन्हा एकदा आयुष्य नक्की लाभावे ।।४।। ®
                                   
          :- ® Gaurav Dekate & Ajay Pardeshi
          :- ✒️ 01 DEC. 2017
          :- Mob No. 8355912106

Shrikant R. Deshmane

आठवणीच्या क्षणांनी हे दिवस आता भरावे
खंत ना कुठली ह्या मनाशी आता उरावे
राहिल शेवटची इच्छा या मित्रांसोबत
पुन्हा एकदा आयुष्य नक्की लाभावे

kharach ahe..
khup chan ajay ji
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Ajay Pardeshi

#2
  धन्यवाद श्रीकांतजी...!!. आपले मनःपूर्वक आभार..!!

Ajay Pardeshi

#3

धन्यवाद श्रीकांत जी !!


Vinod Bhoir

खुप छान कविता...... जुन्या आठवणी ताज्या झाल्या...

Ajay Pardeshi


  धन्यवाद सर...आपल्या प्रतिसाद बद्दल..!!


Sarika Pardeshi

 : :Excellent 🤗🤗 . When I read this poem,  I rememberd  my school days ...🏢🏢🏢

KUSHAL CHOUDHARI

 :)Awseome poem really loved it . Great appreciation from the bottom of my heart. Proud of u Ajay...Good keep it up. God bless you and hope u will entertain us more with ur future writings.