प्रेमभंगानंतर

Started by Ajal Shayar, December 01, 2017, 09:05:31 PM

Previous topic - Next topic

Ajal Shayar

 
       प्रेमभंगानंतर


एकटाच मी समुद्रकाठी बसलेला
प्रेमभंगानंतर एकांतात हरवलेला
गजबलेल्या जगात एकटाच उरलेला

जीवनात अपार दु:ख सोसलेला
आजही लाटांचा मार सोसत बसलेला
मनाच्या जखमेवर मीठ चोळत बसलेला

तुझ्याच आठवणी मनात साठवलेला
आज तू नाहीस याचं दु:ख झेललेला
तू परत येशील अशी खोटी आशा असलेला

तुला भेटण्यासाठी मी आतुरलेला
म्हणूनच स्वत:ला सागरात लोटलेला
आणि इतरांनी पाहीला मला बुडालेला

सुर्यही आता मावळतीला लागलेला
माझं आयुष्य आता संपलं याची
आठवण करून देत असलेला

अजल