शेवटचा श्वास

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 02, 2017, 07:25:49 AM

Previous topic - Next topic
शेवटचा श्वास घेत होतो
मी कुठं होते तिला बोलावले

अंतरात होतो एकटा निपचित पडलेलो
तेव्हा डोळे तिचें पण पाणावले

जाता येता टाहो होता फुटलेला ऐकून
तेव्हा तिला पण नं रहावले

डोकोनी अंतरात घराच्या तेव्हा
घरात पाहून पायही तिचे विसावले

वात तेवणारी उशाची पाहून
का तिनं हुंदके ना रोखवले

नकळत प्रेम करत होतीच ती मजवर
हयात होतो मी तेव्हा का नाही दाखवले

जेव्हा आत्मा पण शांत निद्रेत गेला माझा
तेव्हांच का तिला प्रेम हे पहावले


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Shrikant R. Deshmane

जेव्हा आत्मा पण शांत निद्रेत गेला माझा
तेव्हांच का तिला प्रेम हे पहावले
shevat khup chan kelat..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]