खेडे

Started by Asu@16, December 03, 2017, 04:42:01 PM

Previous topic - Next topic

Asu@16

   खेडे

झुंजूमुंजू झालं
दिली कोंबड्यानं बांग
प्रकाशाचा पसरला
समुद्र अथांग
पक्षी गेले दाण्यापाठी
पिलं किलबिलती घरटी
जागी होता सारी
दारी वासुदेवाची स्वारी
शेतकरी शेतात
पिकवी मोतियाची रास
बाराबलुत्यांच्या मुखी
पडे अमृताचा घास
जरी भांडण ताडन
जो तो कामी दंग
फुरसतीच्या मुखी
नामा-तुक्याचे अभंग
सुखसमाधानाचा अनंत
वाहे निर्झर निर्मळ
पाणवठ्या काठी
बायापोरींची खळखळ
धुती संसाराची धुणी
गात आनंदे साजणी
स्वप्न साठता लोचनी
अधीर फडफडे पापणी
गोधूल उडता नभी
घंटा वाजती मंजुळ
गुरे गोठ्यात येती
होता आकाश सांजुळ
दिवे लागती दाराशी
जशा नक्षत्रांच्या राशी
नार बसली चुल्ह्याशी
भासे अन्नपूर्णा जशी
जरी साधेच जेवण
लागे अमृताची गोडी
अशी रांधते कशी
बांधी नवरसांची मोळी
टाळमृदुंगाची धून
घाली गावा पांघरूण
कष्टकरी विसावतो
खाली गोधडी अंथरून

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita