ती जशी जशी जुनी होत गेली

Started by siddheshwar vilas patankar, December 04, 2017, 08:40:52 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

ती जशी जशी जुनी होत गेली

हळूहळू माझी सोनी बनत गेली

वाईनवानी पहिली कडुशार होती

नंतर मधाचे पाणी बनत गेली

रंगढंग बघूनच तर जवळ गेलो होतो

खटके उडायचे अधूनमधून

नंतर मात्र नवीन कहाणी घडत गेली

या एकल्या जीवाची ती राणी बनत गेली

आधी जे मिळेल ते खायचो नि राहायचो

मग हवी होती कशाला ती बायको ?

डोळे सताड उघडे असायचे, राव

या डोळ्यांचीच ती हळूहळू पापणी बनत गेली

कधी आत हृदयात बसली ते समजलंच नाही

अंगात सळसळणाऱ्या रक्ताची वाहिनी बनत गेली

मित्रा ,, माझी बायको आधी मला नकोशी होती गड्या

आता मात्र माझ्यासाठी अमृत संजीवनी ठरत गेली ...


सिद्धेश्वर विलास पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C

Chatlonut

चांगल्या कथेबद्दल धन्यवाद. ही एक टिप्पणी आहे जी टिप्पणी आहे आणि माझ्यासाठी खूप उपयुक्त

siddheshwar vilas patankar

आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
सिद्धेश्वर विलास पाटणकर C

Shrikant R. Deshmane

वाईनवानी पहिली कडुशार होती
नंतर मधाचे पाणी बनत गेली

chan oli ahet,
masta kavita siddheshwarr ji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

siddheshwar vilas patankar

धन्यवाद श्रीकांत साहेब , आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद

सिद्धेश्वर विलास पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C