उमेद

Started by suryawanshirohit28, December 04, 2017, 08:41:34 PM

Previous topic - Next topic

suryawanshirohit28

मनी दाटलेल्या अंधारात, 
थोडा प्रकाश असावा...
कोमजलेल्या बागेसाठी
प्रवाह  मिळावा...

काटाळलेल्या रस्त्यात,
एक मोकळी वाट करावी,
नव्या उमेदीने जगण्याची प्रेरणा,
प्रत्येक क्षणी मिळावी...

कार्य क्रुतीस उतरवले की, 
हिमालय ही सर होतो...
मग थोडा प्रयत्न करण्यास,
आपण का बरं धजावतो ?

प्रखर तेजस्वी सूर्याचा,
देखील अस्त होतो...
तरी का मग,
आयुष्याच्या चढाओढीत 
आपण स्वतःला गमवतो ?


- रोहित सूर्यवंशी, नाशिक
9767717036
रोहित  सूर्यवंशी  , नाशिक
9767717036