*** एक किस हवी होती मला ***

Started by धनराज होवाळ, December 06, 2017, 09:15:49 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ



😘 #एक_किस_हवी_होती_मला... 😘

एक किस हवी होती मला,
तुझ्या भाग्यवंत कपाळाची..
माझ्या नशीबात असलेल्या,
तुझ्या आईच्या या बाळाची..!!

एक किस हवी होती मला,
तुझ्या निरागस डोळ्यांची..
नजरेने घायाळ करणाऱ्या,
त्या इवल्याशा पापण्यांची..!!

एक किस हवी होती मला,
तुझ्या त्या सुंदर नाकाची..
नथणीमध्ये शोभणाऱ्या,
त्या मराठमोळ्या सुखाची..!!

एक किस हवी होती मला,
तुझ्या पिळदार कानाची..
कानामध्ये लटकलेल्या,
त्या छोट्याशा पानाची..!!

एक किस हवी होती मला,
तुझ्या मखमली केसांची..
डोळ्याभोवती भिरभिरणाऱ्या,
त्या नागमोडी बटांची..!!

एक किस हवी होती मला,
तुझ्या मऊ मऊ गालाची..
कधी कधी खळी पडणाऱ्या,
या गुलाबी मधुबालाची..!!

एक किस हवी होती मला,
तुझ्या पाकळीसारख्या ओठाची..
लाजून मला चूप बसवणाऱ्या
ओठावरच्या पहिल्याच बोटाची..!!

एक किस हवी होती मला,
तुझ्या वेडदायक मुखड्याची..
पाहावं अन् पाहतच राहावं,
अशा चंद्राच्या या तुकड्याची..!!

फक्त एकच किस हवी होती,
सांग ना सखे तु देशील ना..??
आलाच राग जर या वेड्याचा,
तर हसून तो राग तु पेशील ना...???
-
🤴🏻 #प्रेमवेडा_राजकुमार 🤴🏻
( #धनराज_होवाळ )
कुंडल, जि. सांगली.
मो. ९९७०६७९९४९.
🙏🏻🌹❤😘🤴🏻😘❤🌹🙏🏻


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]