बहाणा

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 08, 2017, 06:34:04 AM

Previous topic - Next topic
बहाणा खोटा रोज करतेस तू
इशारा खोटा रोज करतेस तू

खेळ हा संसाराचा मोडला
नेहमीचं भावनांशी खेळतेस तू

वात ती तेवत रहाणारी समजून
दिव्यात का अर्धवट जळतेस तू

समजून बसलो केव्हाच अग्निदाह
त्यात पण नकळत विझतेस तू

काय भेटत तुला असं वागून
प्रेमातला विश्वास का मोडतेस तू

नकोच होतं तुला प्रेम माझं
का अनोळखी होऊन छळतेस तू

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Shrikant R. Deshmane

वात ती तेवत रहाणारी समजून
दिव्यात का अर्धवट जळतेस तू
chan ahe amolji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]