तु कधी प्रेम केलय ???

Started by digambarjude, December 08, 2017, 12:59:42 PM

Previous topic - Next topic

digambarjude

तु कधी प्रेम केलय ???

कधी नव्हे ते आज तीने सहजच विचारलं
तु कधी प्रेम केलय ???

आज तिला फक्त एवढच सांगायच कि,
प्रेम तर मी ही केल होतं
अन ती सुद्धा खुप प्रेम करायची
फरक मात्र एवढाच होता कि,
माझ्या प्रेमामध्ये ती नेहमीच होती,
पन तीच्या प्रेमामध्ये मी कधीच नव्हतो .

खंत वाटत नाही कि,
तिच्या प्रेमामध्ये नसलो तर काय!
तीच्या मैत्रीमध्ये तर आहे.

अन असं म्हणतात कि ,
प्रेमापेक्षा मैत्री नेहमीच श्रेष्ट असते.

                                     :)#JD



     
       
           
   


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]