अर्धवट सोडायचं होते तर....

Started by Vaibhav3799, December 09, 2017, 05:06:22 PM

Previous topic - Next topic

Vaibhav3799

अर्धवट सोडायचं होते तर,

स्वप्न दाखवायचं कशाला ?

प्रेम न्हवते माझ्यावर तर,

प्रेमाचं नाटक करायचं कशाला ?


कुठे कमी पडलो होतो मी,

जीव ओवाळून टाकला होता,

तरी तुला त्याची किंमत,

कळाली नाही एकत्र असताना,

असं अर्धवट सोडायचं होते तर

स्वप्न दाखवायचं कशाला ?


हक्क असा दाखवत होतीस,

जणू आयुष्यभराची साथ देशील,

दोन पावले चालून तू,

अशी लगेच कशी थकलीस,

चूक केली मी प्रेम केलं निस्वार्थाने,

डोळे झाकून विश्वास ठेवला,

त्याची परतफेड तू अशी केलीस,

असं अर्धवट सोडायचं होते तर

स्वप्न दाखवायचं कशाला ?


Feel My Love....

Shrikant R. Deshmane

#1
हक्क असा दाखवत होतीस,
जणू आयुष्यभराची साथ देशील,
दोन पावले चालून तू,
अशी लगेच कशी थकलीस :(

oli khup chan aahet vaibhavji..
fakta hi viraha kavita section madhe post karayla pahije hoti :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]