मदनबावरी

Started by Asu@16, December 09, 2017, 10:29:38 PM

Previous topic - Next topic

Asu@16

       मदनबावरी

अनवट वाट, अवघड घाट
ज्वानीचा नटखट सोसेना थाट
एकटीच चढते मिळेना साथ
बाई, सांगू कुणाला होईल घात

हिरव्या रानात, आंब्याच्या वनात
कोकीळ करतोय कुहू कुहू
वाट साजणाची पाहू किती
बाई, आग विरहाची साहू किती

चोळी झाली अंगी दाट
उसवली गाठ, आेलीचिंब पाठ
रानपाखरं वृक्षी करती उडू उडू
बाई, बावरले मन, लागे धडधडू

अशा छंदी फंदी वार्‍यात
रानी वणवा पेटावा
कृष्णमेघ बनून साजण
बाई, अंगो अंगी भेटावा

धुवांधार पाऊस, पिऊन शांत
निपचित रान, रतिक्लांत एकांत
दर्‍याखोर्‍यातून येती नाचत आेहोळ
बाई, तापल्या अंगा चंदनी आंघोळ

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita