"प्रेम" शब्द जेव्हा माहीत झाला

Started by rushikeshnagargoje00, December 15, 2017, 12:54:32 PM

Previous topic - Next topic

rushikeshnagargoje00

प्रेम हा शब्द जेव्हा माहित झाला
तु समजुन त्याचा विचार केला
नव्हता अर्थही माहित प्रेमाचा
दिसली तु की तो उलगडायचा.

दिवसही काय होते ते प्रेमाचे ?
तु-मला, मी-तुला बघुन हसण्याचे
कळत नव्हतं हे काय असतं
वाटे प्रेम वेगळ काही नसतं.

हळूहळू कळला अर्थ प्रेमाचा
वाढला विश्वास आणखी मनाचा
समजवायचाय तोही  अर्थ तुला
प्रेमानेच एकदा भेटुन मला.

दाटे मनी शंकेचे आभाळ दाट
शोधली नाहीस ना तु तुझी वाट
नको जाऊस तु अशी थांब थोडी
प्रेम सागरी सोडू आपली होडी.
           ------ऋषी नागरगोजे

Shrikant R. Deshmane

दाटे मनी शंकेचे आभाळ दाट
शोधली नाहीस ना तु तुझी वाट
नको जाऊस तु अशी थांब थोडी
प्रेम सागरी सोडू आपली होडी.

shevat khup chan kelat... masta..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]