॥ श्रम बहोत केले , आता जगण्यात राम नाही ॥

Started by siddheshwar vilas patankar, December 15, 2017, 06:11:07 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



श्रम बहोत केले

ध्येय लांब नाही

आयुष्य साधनेत गेले

जगण्यात राम नाही

भूतात मैत्र सारे

अदृश्य ते नजारे

गळा वरमाला पडिता

सीतेचा राम जाई

उरले ते फक्त घरटे

घरट्यात चार पक्षी

दाणापाणी करता करता

चिमणा तो लांब जाई

कसली अशी कमाई

ना बाप मागे, ना आई

अश्रूंनी ताल धरिता

कंठाशी प्राण येई

श्रम बहोत केले

आयुष्य जात राही

कधी मातीत मिसळतो

याचीच वाट पाही

जगण्यात राम नाही

आता जगण्यात राम नाही


सिद्धेश्वर विलास पाटणकर 
सिद्धेश्वर विलास पाटणकर C