।। वसा ।।

Started by शिवाजी सांगळे, December 16, 2017, 07:13:47 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

।। वसा ।।

अभंगाचे गुढ । मनासी आवडे ।
शोधता बापुडे । आपसुक ।।

ऐसा तो महिमा । म्हणती नामाचा ।
उध्दार जीवाचा । होत असे ।।

अकर्म आयुष्य । जमविता माया ।
भोगापरी काया । व्यर्थ जाय ।।

स्वार्थ भाव मनी । करीता पुजन ।
न पावे भजन । देवाजीस ।।

उच्चतम भाव । मांडोनी विचार ।
व्हावे ते आधार । सकलांसी ।।

संतांनी जो दिला । समतेचा वसा ।
पाळे जो खासा । त्यासी कळे ।।

चरणांते भेद । शोधे जो शहाणा ।
बुवा भोंदू जाना । म्हणे शिवा ।।

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९