भेट

Started by कदम, December 19, 2017, 12:34:47 AM

Previous topic - Next topic

कदम


ती भेट शेवटची झाली
मनं मनातून बोलत होती
ती भेट अविटही झाली
मनास शब्दांनी गोंजारत होती

ती भेट हवीशी होती
घेतली एकदा पुन्हा नाहीशी झाली
ती भेट शेवटची होती
त्यानंतर नित्य तु मजपाशी आली

भेटीस लय होता होती भ्रांतही
ओळखीचे होतो होतो संभ्रमातही
आपणहून सुर छेडले क्षणांनीही
मनाचा मनाने होता जिंकला प्रांतही