आज परत एकदा

Started by rushikeshnagargoje00, December 19, 2017, 11:58:55 AM

Previous topic - Next topic

rushikeshnagargoje00

आज परत एकदा,
तुला भेटावसंं वाटतयं.
भेटुन खुप काही,
बोलावलं वाटतयं.
पण कळेना,
कधी, कुठं, कसं, भेटावं?
भेटूनी काय बोलावं ?
कदाचित,
या नवीन दुनियेत,
जुनं सगळं विसरलीही असशील
तरी पण,
भेटुन तुला,
पुन्हा एकदा,
भूतकाळात न्यावसं वाटतयं.
माणसं आपण सगळेच यंत्र,
तरी पण,
यांत्रिकपणा बाजुला ठेवुन,
माणूस व्हावसं वाटतयं.
पुन्हा एकदा जुने,
तु-ती आणि मी-तो व्हावसं वाटतयं.
                --------   ऋषी नागरगोजे