अगं आई

Started by rushikeshnagargoje00, December 19, 2017, 12:24:59 PM

Previous topic - Next topic

rushikeshnagargoje00

मागं बापाचं होणार काय?
कळत होतं,
तरी, काय करु?
ते स्वप्न मला छळत होतं.
रडुन आई माझी,
मोकळा करेल ऊर,
फुंदत-फुंदत बाप माझा,
धरील धीर.
अगं आई,
तु मला,
समजुन घ्यायचं होतं,
तो आहे बाप,
त्याला काय मनातलं समजतं?
बोलली असतीस,
मोकळेपणाने माझ्याशी.
एकटेपणा नसता राहीला,
असा मनाशी.
विचारलसं,
काय हवयं आपल्या लेकीला?
म्हणून तर गं,
बोलाव लागलं विहिरीला.
सांगितलच नाहीस कधी,
काय चुकतयं.
चुक बरोबर मला तरी,
काय समजतयं.
चुकलेच कधी,
तोंडात मारायच्या दोन.
मी तर तुझीच,
तुला बोललं असतं कोण?
बोलली नाहीस,
तु राग धरुन बसलीस,
नजरेत माझ्या मी,
नाही राहिले कसलीच.
तुझ्या -माझ्या रागाचं,
सावट मनी दाटलं.
जीवनापेक्षा मरणच,
मला बरं वाटलं.
            --------  ऋषी नागरगोजे