* माणुसपण *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 19, 2017, 02:18:24 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


*माणसाला माणुस म्हणावं की जनावर*
*हा प्रश्न नेहमीच पडतो मला*
*माणसांतला माणुस मरतांना पाहुन*
*लाज वाटते माणुस म्हणवुन घेतांना स्वताला*

*अन जनावर म्हणुन माणसाला*
*जनावराचा अपमान नाही करायचा मला*
*कारण माणसाला नसली तरी*
*माया ममता असते जनावराला*

*ज्यापासुन उत्पन्न झाली आपली पितरे*
*जीवे मारले आज त्याच मुक्या वानराला*
*असा कोण अक्षम्य गुन्हा त्याने केला*
*म्हणुन तु तुझ्यातलं माणुसपण विसरला*
*तुझ्यातलं माणुसपण विसरला*
*कवी - गणेश साळुंखे*
*📱 - 8668672192*