शिक्षक

Started by Asu@16, December 20, 2017, 06:13:05 PM

Previous topic - Next topic

Asu@16

        शिक्षक

शिकणाऱ्यांना शिकविण्यात
शिक्षकाला खरी मजा असते
दगडधोंड्याच्या वर्गात मात्र
लेक्चर म्हणजे सजा असते

        क्षुधितांना घास देणे
        हाच खरा धर्म असतो
        क्षुधाभावी घास देणे
        हा शुद्ध अधर्म असतो

जगण्याची इच्छा असेल तर
उपचारांना अर्थ असतो
जिवंतपणीच मेलेल्यांवर
उपचारही व्यर्थ असतो

        बुडत्याला हात देऊन
        वाचविणारा शिक्षक असतो
        पडत्याला पंख देऊन
        उडविणारा शिक्षक असतो

विद्यार्थ्यांचं भलं चिंतणारा
तो एक रक्षक असतो
त्यांच्या यशात यश पाहणारा
निःस्वार्थी शिक्षक असतो

        शिकविता शिकविता शिकणारा
        तोच खरा शिक्षक असतो
        शिकविता शिकविता विकलेला
        तो (तर) खरा भिक्षुक असतो.

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita