तर माणूस तु रे कैसा ...

Started by कदम, December 20, 2017, 06:27:37 PM

Previous topic - Next topic

कदम


बिझनेस ऊभारतो पैस्याने
माणूस ऊधारतो पैस्याने
कमिशनमध्ये पाहिजे पैसा
मजुराला पाहिजे पैसा
मंजुरीला पाहिजे पैसा
जर नसेल जवळ पैसा
तर माणूस तो रे कैसा ...

देणगी रूपात पैसा
दक्षिणा रूपात पैसा
नौकरी साठी पैसा
नौकरदाराला पैसा
ज्याला त्याला हवाय पैसा
जर नसेल जवळ पैसा
तर माणूस तो रे कैसा ...

फिससाठी पैसा
बुक्ससाठी पैसा
युनिफॉर्मसाठी पैसा
बेटर परफाॅर्मन्ससाठी पैसा
जिथे तिथे गरजेचा पैसा
जर नसेल जवळ पैसा
तर माणूस तो रे कैसा ...

पार्टीसाठी पैसा
कार्टीसाठी पैसा
फेस्टीवलसाठी पैसा
फंक्शनसाठी पैसा
वरात व-हाडासाठी पैसा
जर नसेल जवळ पैसा
तर माणूस तो रे कैसा ...

प्रवासासाठी पैसा
पेश्यासाठी पैसा
खुशी घेण्यासाठी पैसा
दुःखांचा कैवारी हा पैसा
पैसा पैसा पैसा
जर नसेल जवळ पैसा
तर माणूस तो रे कैसा ...

माडीसाठी पैसा
गाडीसाठी पैसा
स्टेटससाठी पैसा
स्टार्ट अप साठी पैसा
मेडिकल चेक अप साठी पैसा
जर नसेल जवळ पैसा
तर माणूस तो रे कैसा ...

शीघ्रकार्यी पैसा
अग्रस्थानी पैसा
खरीदीला पैसा
विक्रीला पैसा
पैसा पैसा पैसा
जर नसेल जवळ पैसा
तर माणूस तो रे कैसा ...