प्रेमकविता ( नेहमीच एकटा एकतर्फी )

Started by कदम, December 22, 2017, 08:43:58 PM

Previous topic - Next topic

कदम


नेहमीच एकटा एकतर्फी काढाव्या का
मी आठवणी
कधी मनातील सुर होऊन उमटावी तु ओठांवरती
कधी रातीचे स्वप्न होऊन प्रकटावी तु
माझ्याचकरवी
कधी विचारांना देवून साक्ष घडावी
साथ तुझीनी माझी
कधी एकांती माझ्या मनाशी गाठ पडावी
तुझ्या मनाची

नेहमीच करतो याचना आठवण का ही
प्रियेची
नित्य चांदणे लखलखीत घेऊन भेटावी तु
रोजनिशी
कधी दरवळणारा वायु होऊन मजसी तु भिडावी
कधी होऊन मी नदी वाहावे अन् तु किना-यावर थोपवशी ...
कधी जुळली बंधनात मनं ना तुला कळावी
ना मला कळावी


नेहमीच असते घाई तुला,त्यास ओढ माझी असावी
कधी पुष्कळशा भेटीगाठी होवून हृदयातील
कंपने शमावी
कधी पुष्कळशा दाटी-वाटीतून थेट तु हृदयात भरावी
कधी निखारे ओकता दिवस ही ढळवा तु अशी नेहमीच भेटावी
कधी हारकत मला नसावी तु माञ माझी असावी