प्रेमाचे जुलाब

Started by Swapnil12491, December 24, 2017, 09:21:16 PM

Previous topic - Next topic

Swapnil12491

दोघे एकमेकांना ओळखू लागले
एकमेकांच्या गोष्टी समजू लागले
समोरच्याच्या चुका पोटात घालू लागले
काहीसे स्वतःला लपवू लागले
सर्वकाही चांगलेच दाखवू लागले
दिवस खूप छान आले
एकमेकांना वेळ देऊ लागले
काही काळानंतर,
स्वभाव मात्र त्यांचे बदलू लागले
लपवलेल्या चुका एकमेकांना टोचू लागले
आवडी निवडींना वेगळी वळणे देऊ लागले
एकमेकांना अगदी नकोसे वाटू लागले
आणि एकंदरीत
हृदयाला प्रेमाचे जुलाब झाले
:-X :P