बेहोषितच जगण असत

Started by ajay81, December 25, 2017, 09:37:49 PM

Previous topic - Next topic

ajay81

आज खूप दिवसांनी मी
केवळ तुझ्यासाठीच लिहिणार आहे
माझ्याच नकळत मी
तुझ्याशी बोलणार आहे
तु कोण आहेस? कशी आहेस? माहीत नाही
ह्या शब्दांत तुला पाहण्याचा प्रयत्न मी करणार आहे
तु असशील हसरी थोडी लाजरी
स्वप्नांमध्ये रमणारी
असशील तुसुध्दा माझ्यासारखी
भावविश्वात जगणारी
तुझ्याशी भेट होईल की नाही
मला हे सुद्धा ठाऊक नाही
ह्या मनःपटलावरचे तुझे चित्र
पुसता पुसल्या जात नाही
तुला आठवुन तुझ्यावर लिहिण
हेच तर कवितेच कारण असतं
खर सांगू...
     तु नसताना तुला अनुभवण
      ह्या बेहोषितचं जगण असत

               _अजय शेरे :)