चांदणे

Started by shamtarange, January 03, 2018, 07:23:18 PM

Previous topic - Next topic

shamtarange

लख्ख चांदणे दिसते जेव्हा
विरून जाते माझे 'मी' पण!
जरा पाहता वळून मागे
हवे वाटते पुन्हा बालपण!
आई असते घरात जेव्हा,
गजबजलेले असते अंगण!
सुख शेवटी घरी भेटले,
फिरून आलो जगात वणवण
अजून आपण समीप येतो,
होते जेव्हा आपले भांडण!
पापाचा या हिशोब लावा,
माझे, देवा भरले रांजण!
सुखाचा वा असो दुःखाचा
जगून घ्यावा म्हणतो हा क्षण!
दिवसा एकटा जगून घेतो
संध्याकाळी येते दडपण!
क्षितीजाशी घर माझे आहे,
चालत जाऊ दोघे आपण!
दुःखाचा मज पगार दे तू
तुझ्या सुखाची करेन राखण!

https://marathikavy.wordpress.com/


sneha31