==* प्रश्न माझ्या देशाचा आहे *==

Started by SHASHIKANT SHANDILE, January 04, 2018, 01:21:48 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

प्रश्न जाती धर्माचा नाही
प्रश्न माझ्या देशाचा आहे
तुम्ही राखा तुमची जात
मी फक्त या देशाचा आहे

कोण कुठले बाहेरचे
करू पाहत होते राज्य
सर्व एकमताने लढले
मिळावं म्हणून स्वराज्य

लढले जे इंग्रजांविरुद्ध
माझ्या देशाचे वाघ होते
जे भडवे इंग्रजांचे झाले
माझ्या देशावर डाग होते

आज उद्या कधीही बघा
मी तुम्हा सर्वांचा आहे
प्रश्न जर राहील देशाचा
मी माझ्या देशाचा आहे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!

शिवाजी सांगळे

खूप छान प्रेरणादायी कविता आहे. स्वतः पलीकडे देशाचा विचार करायला वेळच नाही हल्ली कुणाकडे.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

SHASHIKANT SHANDILE

धन्यवाद सांगळेजी

बरोबर बोललात तुम्ही .........
Its Just My Word's

शब्द माझे!