मनाचा डोह

Started by Asu@16, January 07, 2018, 04:54:13 PM

Previous topic - Next topic

Asu@16

मनाचा डोह

मनाचा डोह
गूढ काळाशार
आर ना पार
आयुष्याचे सार
      भूतकाळाची भुतं
      सदा सर्वकाळ
      तळाशी साठला
      आठवणींचा गाळ
सोसाट्याचा वाराही
उठविना लाटा
आयुष्याच्या इथे
अंधारल्या वाटा
      कधी मंद झुळूक
      उठवी तरंग
      झोपाळल्या जगण्याला 
      देई उमंग
अचानक कधी
फुटे बुडबुडा
अंतरात घाली
आठवणींचा सडा
      कल्पनेचा पक्षी
      उडे डोहातून
      उंच भरारी नभी
      नक्षी ढगातून
इथे ना चाले
कुणाचीच सत्ता
अदृश्य शक्तींचा
थांग ना पत्ता

- अरुण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita