वार झाले

Started by शिवाजी सांगळे, January 11, 2018, 11:35:15 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वार झाले

गाजल्या न मैफिली ना सत्कार झाले
लिहिले सहजी कि शब्दांनी वार झाले

कुचकामी  ठरे  देह  जीवंत  बोलका
कार्ड आताशा जगण्या आधार झाले

फुटताच फटाका एक दंगलीत असा
सगळेच कार्यकर्ते  मग  फरार  झाले

टाळले  ज्ञानी  कराया लोकां त्यांनी
मानधन देतो  म्हणताच तयार झाले

मांडल्या अशा खास संख्या व्यवस्थेने
अकारण समा+जात भागाकार झाले

येताच  चार  पैसे खिशात फुकटाचे
विसरलेले शौक फिरूनी यार झाले

चालल्या जरी चर्चा किती शांततेच्या
कर्तव्यात  दुतर्फा  सैनिक ठार झाले

© शिवाजी सांगळे 🎭

संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

संजय जोशी

शिवाजी सर, खूपच छान जमली आहे .... समा + जात हे खूपच छान वाटले ....
आज ची व्यथा तुमच्या प्रत्येक शब्दातून जाणवते ...

शिवाजी सांगळे

खूप धन्यवाद संजयजी,
रोजच्याच घटना लिहिण्याची प्रेरणा देतात.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९